बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भय्यू महाराज प्रकरणी धक्कादायक खुलासा, चॅटपाहून पोलिसांनाही बसला धक्का

भोपाळ | अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. भय्यू महाराज यांना पलक नावाची तरुणी अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्रास देत असल्याचं समोर आलं आहे.

26 नोव्हेंबर रोजी न्यायालयात तब्बल 109 पानांंचं व्हॉट्सअ‍प चॅट सादर केलं आहे. पलकच्या त्रासाला कंटाळूनच भय्यू महाराज यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

फॉरेन्सिक टीमने सादर केलेल्या अहवालात पलक ( Bhayyu Maharaj ) नावाची तरुणी पीयूष जीजू नावाच्या एका व्यक्तीसोबत व्हॉट्सअपद्वारे चॅट करत असल्याचं समोर आलं आहे. त्यातून काही तथ्य समोर आल्याचा दावा केला गेला आहे. त्यामुळे भय्यू महाराज प्रकरण हे एक खूप मोठं षडयंत्र होतं, असं आता उघड झालं आहे.

भय्यू महाराज यांनी टोकाचं पाऊल उचलल्यानंतर पोलिसांनी पलकसह आणखी काही जणांना अटक केली होती. सर्व आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. सर्व आरोपींच्या मोबाईल चॅटिंगचा डेटा रिकव्हर केला. या चॅटमधून जी माहिती समोर आली ती पाहून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आहे. आरोपी चॅटिंग करताना भय्यू महाराज यांचा उल्लेख BM या सांकेतिक नावानं करायचे. एका चॅटमध्ये तर त्यांनी केलेला उल्लेख अत्यंत धक्कादायक आहे.

थोडक्यात बातम्या- 

“पहाटेच्या शपथविधीचा प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी सल”

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

“नारायण राणे म्हंटल्याप्रमाणं इतिहास घडेल अन् सरकार पडेल”

नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा, मात्र बाळासाहेब थोरातांचा वेगळाच सूर

“तेव्हा अजितदादा मला म्हणाले, अरे हरभजनदेखील मॅच जिंकून देतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More