बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इन्कम टॅक्सच्या तपासात धक्कादायक खुलासा, 256 पानटपरी, ठेलेवाले निघाले करोडपती!

नवी दिल्ली | पानटपरी, चहावाला, पानीपुरीवाला यांचं महिन्याचं उत्पन्न किती असेल?, असा विचार आपल्या मनात कित्येकदा येऊन गेला असावा. कारण कितीही धंदा जोरात चालत असला तरी त्यांच्याकडे जास्तीत जास्ता लाखांपर्यंत शिल्लक रक्कम असेल. मात्र कानपूरमधील 256 ठेलेवाले कोट्यधीश ठरले असल्याचं तसापात दिसून आलं आहे.

बिग डेटा सॉफ्टवेअर, प्राप्तीकर विभाग आणि जीएसटी रजिस्ट्रेशनने संयुक्तपणे केलेल्या या तपासामध्ये अशा 256 जणांची नावं पुढे आली आहेत. 256 जे आहेत ते छोटे मोठे गाडे आणि टपऱ्या चालवतात. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचं समजत आहे. टीव्ही 9 भारतवर्षने याबाबत वृत्त दिलं आहे.

पान टपरी आणि हातगाडी चालवणारे किराणा दुकान चालवणाऱ्यांचाही समावेश आहे. या तपासात असं दिसून आलं, की भंगार विकणारे जे आहेत ते तीन-तीन एसयूव्ही गाड्यांचे मालक आहेत. तर कित्येक फळ विक्री करणारे गुंठे बागायती जमिनीचे मालक आहेत. महत्त्वाचं म्हणजे यातील कोणीही प्राप्तीकर भरत नाहीत.

दरम्यान, या तपासामध्ये असंही समोर आलं आहे की, जीएसटीमध्ये नोंद नसलेल्या व्यापाऱ्यांनी जवळजवळ चार वर्षांमध्ये तब्बल 375 कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली आहे. ज्या व्यापाऱ्यांनी जीएसटी नोंदणी केली नाही, अशा लोकांना पकडण्यासाठी बिग डेटा सॉफ्टवेअरचं नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

राज कुंद्रासोबत आता अजिंक्य रहाणे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहा काय आहे प्रकरण

‘या’ देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी

पोर्नोग्राफी प्रकरणी नवऱ्याला अटक झाल्यावर शिल्पाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवतात”

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या 100 दिवसातील सर्वात कमी रूग्णसंख्येची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More