बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील ‘त्या’ पोलिसाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा, बुधवार पेठ कनेक्शन?

पुणे | दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या फरासखाना पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले समीर सय्यद यांची कुख्यात गुन्हेगार प्रवीण महाजन याने बुधवार पेठेत हत्या केली होती. रात्री एक वाजता प्रवीण महाजनने समीर सय्यद या पोलिस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या केल्यानंतर फरासखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रवीण महाजनला अटक केली होती.

दरम्यान, या प्रकरणात आणखी खुलासे होत असताना पाहायला मिळत आहे. बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या महिलेशी झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर येत आहे. समीर सय्यद हे प्रवीण महाजन याचं प्रेम असलेल्या एका महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते. या सर्व प्रकरणात प्रवीण महाजन आणि सय्यद या दोघांमध्ये दीड महिन्यापूर्वी वादंगही पेटलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचं कागदोपत्री नमूद केलं आहे. पण या महिलेबाबत आणि त्या महिलेच्या चौकशीबाबत पोलिसांना विचारल्यास पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी आपल्या कर्मचाऱ्याबद्दलची वैयक्तिक माहिती आपल्याकडे नसल्याचं सांगून वेळ मारून नेली आणि या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, प्रवीण महाजन याचे बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते आणि समीर सय्यद हे पोलिस कर्मचारी त्या महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत होते. त्यामुळे प्रवीणने सय्यद यांचा खून केल्याची चर्चा सध्या पोलिस विभागातच सुरू आहे.

थोडक्यात बातम्या –

“सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्या लोकांनी राजकीय भाष्य करू नये”

पुण्यातील कडक लाॅकडाऊनबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांचं सुचक वक्तव्य

पु.ल.देशपांडे यांची ‘ती’ व्हिडीओ क्लिप शेअर करत महाराष्ट्र पोलिसांनी दिला महत्वाचा सल्ला

“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गुदमरत आहेत, ते लवकरच आघाडीतून बाहेर पडतील”

कोरोनामुळे ‘या’ भाजप आमदाराचं निधन; आतापर्यंत 4 भाजप आमदार कोरोनाचे बळी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More