बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बॉलिवूडमधील मित्रांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला’; प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदेचा खुलासा

मुंबई | प्रत्येक यशस्वी माणसाला आयुष्यात कठीण काळ हा येतोच. अशाच प्रकारे बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदेच्याही आयुष्यात असंच काहीसं घडलं आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने याबाबत खुलासा केला आहे.

काही चित्रपट मित्रांसाठी केले मात्र पुढे नंतर हेच मित्र माझ्या पाठीमागे माझ्याविरोधात बोलू लागले. बॉलिवूडमध्ये आपण मित्र म्हणवतो पण मित्र फार कमी असतात. अगदी 10 टक्केच लोक असतात जे तुमच्या प्रगतीने आनंदीत होतात. तुमच्या पाठीशी ते उभे राहतात, असं श्रेयस म्हणाला.

इंडस्ट्रीत माझे काही मित्र आहेत, ज्यांना मी सिनेमात आलो की त्यांना असुरक्षित वाटतं. इथवर ते थांबत नाहीत. तर मी सिनेमात येऊ नये यासाठीही ते प्रयत्न चालवतात. अशा मित्रांसाठी मी अनेक फिल्म्स केल्या. त्यांच्यासाठी म्हणून केल्या. पण नंतर हीच मंडळी माझ्याविरोधात माझ्या पाठीमागे बोलताना मला जाणवलं असल्याचं श्रेयस तळपदेने सांगितलं.

दरम्यान, बॉलिवूडमधल्या मित्रांसाठी मी सिनेमे केले, इक्बाल या चित्रपटानंतर नंतर माझ्याकडे तशाच प्रकारच्या अनेक स्क्रीप्ट्स आल्या. पण मी त्या सगळ्याच स्वीकारल्या नाहीत. कारण सिनेमा करतानाच मी अत्यंत निवडून गोष्टी घेत होतो. मला सुभाष घई यांचा अपना सपना मनी मनी हा सिनेमा आला होता. पण मी कमर्शिअल फिल्मस करायचा विचारच करत नव्हतो, त्यांनाही याचं नवल वाटलं असल्याचं श्रेयस तळपदेने सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

माझा प्रणीतदादा गेला… मित्राच्या मृत्यूनं प्रविण विठ्ठल तरडे हळहळले!

“एकाचं लक्ष मुंबईवर अन् दुसऱ्याचं बारामतीवर, उर्वरीत महाराष्ट्र वाऱ्यावर”

देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांचं निधन

भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवल्याचा भाजपचा आरोप, अजित पवार म्हणाले…

“…तर पुढच्या दोन आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More