Dattatray Gade l पुणे-स्वारगेट (Pune-Swargate) एसटी (ST) स्थानकावरील बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या दत्तात्रय गाडेने (Dattatray Gade) प्रेमविवाह केला होता आणि त्याला सात वर्षांचा मुलगा आहे. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे तो काम करत नव्हता, त्यामुळे त्याचे पत्नी आणि कुटुंबीयांशी वाद होत होते. पोलिस तपासात, तो समलैंगिक संबंध ठेवून पैसे कमवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
समलैंगिक संबंध आणि आर्थिक व्यवहार :
आरोपीचा भाऊ शेती करतो, पण आरोपी शेतीकडे दुर्लक्ष करून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो समलैंगिक संबंध ठेवत होता, ज्यातून त्याला काही प्रमाणात पैसे मिळत होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
घटनेच्या दिवशी दुपारी पोलिसांनी त्याच्या घरी चौकशी केली, तेव्हा त्याच्यासारख्या दिसणाऱ्या भावाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. आरोपीला चुलत भावाकडून ही माहिती मिळाली. संशय आल्याने त्याने फोन बंद करून पलायन केले. पोलिसांनी १६-१७ पथके, ग्रामस्थ, पोलिस पाटील (Police Patil) आणि तरुणांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. जवळपासच्या पाच-सहा गावांतील ग्रामस्थांना बोलावून, साडेतीन हजार लोकांची बैठक घेऊन त्यांना शोधमोहिमेत मदत करण्याचे आवाहन केले.
Dattatray Gade l आरोपीचा शोध आणि स्वभाव :
श्रीगोंदा (Shrigonda), दौंड (Daund), स्वारगेट, अहिल्यानगर (Ahilyanagar) भागातील बसस्थानक, रेल्वेस्थानक येथेही पोलिसांनी शोध घेतला. त्याचे मित्र, नातेवाईक यांचीही चौकशी केली. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून, वर्षभरात तो कुठे फिरला, कोणाशी संपर्क साधला, त्याचे मित्र-मैत्रिणी कोण, त्याची स्वभाववैशिष्ट्ये काय आहेत, याचा अहवाल तयार केला. पंढरपूर (Pandharpur), उज्जैन (Ujjain), शिर्डी (Shirdi), शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथे तो गेल्याचे आढळल्याने पोलिसांनी तेथे पथके पाठवण्याची तयारी केली होती.
गुनाट गावाजवळील १०० ते १५० एकर उसाच्या शेतात आरोपी लपला होता. सुरुवातीला मळकट कपड्यांमध्ये, अनवाणी पायाने फिरत राहिल्याने पोलिसांना तो सापडला नाही. या काळात तो शेतातील ऊस आणि टोमॅटो खाऊन राहत होता. मात्र, पाणी आणि भूक लागल्याने तो बाहेर पडला आणि दोन ग्रामस्थांना दिसला.