मुंबई | डॉन दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) कराचीतच असल्याचं उघड झालंय. दाऊदचा भाचा अलीशाह पारकरने ईडीला दिलेल्या जबानीत हे उघड केलंय.
दाऊद 1986 पर्यंत डंबरवाला भवनच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये असल्याचं मी विविध लोकांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकलं आहे, असं अलीशाहने ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
दाऊदची बहीण हसिना पारकरचा (Hasina Parkar) मुलगा अलीशाह पारकर सध्या ईडीच्या ताब्यात आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये आहे तो 1986 नंतर भारत सोडून गेला होता, अशी माहिती अलीशाहने ईडीला दिली आहे.
हसीना पारकर ही दाऊदची बहीण आहे. पण त्यांचं कुटुंब दाऊदच्या संपर्कात नाही. दाऊदची पत्नी मेहजबीन सणांच्या वेळी अलीशाहची पत्नी आणि बहिणींशी संपर्क साधते अशी माहिती अलीशाहने दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
शिवसेनेनं संभाजीराजेंना डावल्यानंतर मराठा संघटना आक्रमक; दिला गंभीर इशारा
प्रेयसीसोबत सेक्स करताना 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, तपासातून धक्कादायक माहिती समोर
औरंगाबादेत मोर्चा लोकल लोकांनी काढला- पंकजा मुंडे
‘…तर आताच राजीनामा देतो’; उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
“मावळे असतात म्हणून राजे असतात, राजांना पक्षांचं वावडं असू नये”
Comments are closed.