बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! इंटरनेटवर हत्या कशी करायची सर्च करून, दुसऱ्या दिवशी पत्नीचीच केली हत्या

पालघर | देशात सगळीकडे आजकाल हत्या , बलात्कार याचे प्रमाण वाढत चालले आहे. दररोज यासंदर्भातील अनेक बातम्या कानावर पडतात. अशातच विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. इंटरनेटवर हत्या कशी करायची याची पद्धत सर्च करून, एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपीचे नाव अजय हरभजन सिंह असून, त्याचे वय 35 वर्षे आहे. अजयला पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहेत. पहिले लग्न झाले असतानाही, अजयने मृत महिला रूबीशी दुसरा विवाह केला. विवाह झाल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. अजय, रूबी आणि त्यांचा मुलगा हे विरारमध्ये राहत होते. रूबीची मोठी बहिण आपल्या कुटुंबासोबत अजय आणि रूबी राहत असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर राहत होती.

रूबीची मोठी बहिण 25 मे रोजी तिच्या घरी गेली. पाहते तर काय रूबी बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिने नीट पाहिलं असता, तिच्या नाकातून रक्त येत होतं. त्यानंतर तातडीने तिने आपला भाऊ आणि वहिनीला बोलावले. त्याचवेळी आरोपी अजय घरातच एका खुर्चीवर बसला होता. बहिणीने रूबीला काय झाले आहे? असं अजयला विचारले असता, त्यावर तो न काही बोलता गप्प बसून राहिला. त्याच्या या वागण्यावरून रूबीचा खून त्यानेच केला असावा, असा संशय रूबीच्या बहिणाला आला.

या घटनेची माहिती रूबीच्या बहिणीने विरार पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. अजय नेहमी इंटरनेटवर हत्या कशी करायची याच्या विषयी माहिती पाहायचा, असं रूबीच्या भावाने पोलिसांना सांगितले. त्यानंतर अजयला विचारले असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यावरून पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्या केल्याचा गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे.

थोडक्यात बातम्या-

आईचा कोरोनाने मृत्यू; बातमी कळताच मनाला सावरत स्वत:च्या कामाची जबाबदारी अगोदर पूर्ण केली

‘नमस्कार, राज बोलतोय….’; मुख्यमंत्र्यांना मदतीची मागणी करणाऱ्या शिक्षिकेला राज ठाकरेंचा फोन

दिलासादायक! देशातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट,पाहा आकडेवारी

‘या’ अभिनेत्रीचा आपल्या आजीसोबतचा डान्स सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने पत्नीवर गोळ्या झाडून त्यानंतर केला ‘हा’ धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More