शिंदे गटातील खासदाराचा धक्कादायक गौप्यस्फोट!
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. आता पुन्हा त्यांना मोठा धक्का बसणार असल्याचं दिसतंय.
ठाकरे गटातील आमदार खासदारांच्या स्थानिक अडचणी असल्याने ते थांबून आहेत. मात्र ते आगामी निवडणुकीपूर्वीच शिंदे गटात सामील होतील, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील खासदाराने केलाय.
बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा नवीन गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटातील राहिलेले आमदार खासदार हे निवडणुकीपूर्वी शिंदे गटात सहभागी होतील, असं सांगून खळबळ उडवून दिली आहे.
शरद पवार यांच्या सांगण्यावरून राऊत यांनी ठाकरे गट रिकामा केला असून राऊत हे शरद पवार यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत, असाही आरोप जाधव यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.