बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी दुर्घटना! नदीत बोट उलटल्यानं 22 जण बुडाले

पटना | बिहारमध्ये नदीत बोट उलटल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 22 जण बुडाले. या घटनेची माहिती समजताच आसपासचे लोक जमा झाले आणि त्यांनी लगेचच पोलीस प्रशासनाला कळवलं.

बिहारच्या पूर्व चंपारणमध्ये रविवारी सकाळी ही मोठी दुर्घटना घडली. बुडालेल्या 22 जणांपैकी एक लहान मुलीचा मृतदेह सापडला आहे आणि सापडलेल्या पाच जणांना रुग्णालयात दाखल केलं आहे. अजूनही लोक बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत.

प्रशासनाकडून मदत पोहोचण्याआधीच स्थानिक लोकांनी आपल्या पातळीवर नदीत बुडालेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं होतं. ज्या लोकांना पोहायला येत होतं त्यांनी नदीत उड्या घेत बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, मोतिहारीच्या शिकारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोढियातील सिकारहाना नदीत बोट उलटली. यामुळे बोटीतील 22 लोक नदीत बुडाले. मात्र आता याची अजून चौकशी, तपासणी सुरु आहे.

थोडक्यात बातम्या – 

“अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत”

“केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येणं, ही फॅशनच झालीये”

“अजूनही मनुवादी जिवंत असल्यानं ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय’”

“भाजपसारख्या नीचपणाच्या, असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार”

गेली 70 वर्षे ‘या’ मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाची सत्ता येते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More