बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कार खाली उडी घेत आत्महत्या

अकोला | एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच पेटल्याचं पहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. अशातच अजूनही कर्मचाऱ्यांचा संप काही मिटेना. त्यामुळे सरकारनंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यानं धक्कादायक पाऊल उचललं आहे. अकोल्यातील एका एसटी कर्मचाऱ्यानं धावत्या कार खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अकोला ते अकोट मार्गावर देवरी फाट्यानजीक शहादा डेपो एस टी कर्मचारी अरविंद चव्हाण यांनी आत्महत्येचं धक्कादायक पाऊल उचललं आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेला होता. त्यामुळे त्याला खात्यातून बडतर्फही करण्यात आले होते.

दरम्यान, दिवसेंदिवस हा संप चिघळतच चालला आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. यातच काही आगारांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही आगारातील कर्मचारी अजूनही संप मागे घेण्यास तयार नाहीत.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवारांचे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?”

कोरोना नियम पाळून छत्रपती संभाजी महाराजांचा 342 वा राज्यभिषेक सोहळा थाटामाटात साजरा

“महिलांचा विनयभंग आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालतायेत”

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

मोठी बातमी! नितेश राणेंना पुन्हा न्यायालयाचा दणका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More