बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कोरोनाचा डेंजर प्रसार सुरु, पाहा गेल्या 7 दिवसांची धक्कादायक आकडेवारी

पुणे | पुणे शहर हे सध्या देशातील कोरोना हाॅटस्पाॅट बनलं आहे. पुण्यातील रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. फक्त शहरातच नाही तर पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यावरून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्वाची बैठक बोलवली होती.

मागील सात दिवसांमध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना रूग्णसंख्येची गंभीर स्थिती समोर येत आहे. मागील सात दिवसात पुणे महापालिका क्षेत्रातील एकूण रूग्णसंख्या 25 हजार 207 रूग्णांची वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 25 मार्च पुणे महापालिका क्षेत्रात 3 हजार 340 पॉझिटिव्ह रूग्ण सापडले होते. तर त्यानंतर 26 मार्चला चालू संख्येत 339 रूग्ण वाढून शहरात 3 हजार 679 पॉझिटिव्ह रूग्ण सापडले होते.

२७ मार्चला पुणे शहरात 3 हजार 522 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते. त्यानंतर 28 मार्चला रूग्णसंख्येने आणखी हजाराची वाढं होऊन 4 हजार ६२५ पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. २९ मार्च पुण्यात रूग्णसंख्या काही प्रमाणात कमी होऊन 2 हजार 554 रूग्ण सापडले. तर 30 मार्चला 3 हजार 226 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली होती. 31 मार्चला पुणे महापालिका क्षेत्रात 3 हजार 287 पॉझिटिव्ह रूग्ण सापडले होते. तर 1 एप्रिलला रूग्णसंख्येने नवीन आकडा गाठत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4 हजार 200 वर पोहचली होती. 

दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुढील 7 दिवस अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. पुण्यात संध्याकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांच्या प्रकृतीवर केलेल्या टीकेबद्दल भाजपने माफी मागावी, नाहीतर….- हसन मुश्रीफ

पुण्यात संध्याकाळी ६ नंतर सारं काही बंद, मात्र फूड डिलिव्हरीसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनाचा नवा विषाणू आहे अत्यंत घातक, जाणून घ्या नवीन विषाणूची लक्षणं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार!

“येत्या 15 ते 20 दिवसात देशात कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More