बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थीनीनं उचललं धक्कादायक पाऊल!

नांदेड | कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सगळंच बंद करण्यात आलं आहे. यामध्ये शाळा, काॅलेजेचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत शिक्षण पद्धतीतही बदल करण्यात आले आहेत. शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण दिलं जात आहे. अशातच आॅनलाइन शिक्षणासाठी घरातून मोबाईल मिळू न शकल्याने अभ्यास चुकतोय या तणावाखाली एका विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

नायगाव शहरातील फुलेनगर वसाहतीत राहणाऱ्या व अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या बिद्धशीला पोटफोडे हिनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. दहाव्या वर्गातून उत्तीर्ण झालेल्या बुद्धशिलानं आॅनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याकारणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन स्वत:ला संपवलं आहे.

बुद्धशीला सध्या अकरावीला शिकत होती. तिला दहावीला 75 टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळवण्यासाठी तिला अभ्यासात मागं पडायचं नव्हतं. तिनं आपल्या आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. घरच्यांनीही लवकरत मोबाईल घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील मजुराच्या 17 वर्षीय मुलीनं मोबाईल न मिळाल्याने स्वत:ला संपवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

“ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही”

‘राष्ट्रवादी-शिवसेनेत वितुष्ट निर्माण होणार नाही’; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतरही राष्ट्रवादीला विश्वास

सरनाईकांच्या लेटरबॉम्बवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा…- गोपीचंद पडळकर

अनिल अंबानींना मोठा झटका; अडचणी वाढण्याची शक्यता

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More