बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं असलेल्या कारमालकाचा संशयास्पद मृत्यू

मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात असतानाच स्फोटक असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानं आता पोलिसांपुढे नवा पेच उभा राहिला आहे. मुंब्रा येथील रेतीबंदराच्या खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे.

पेडर रोडवर असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या घरासमोर त्यांच्या गाडीशी मिळता जुळता नंबर असलेल्या नंबरची स्कॉर्पिओ गाडी नो पार्किंगच्या फलकाखाली लावण्यात आली होती. सदरील गाडीमध्ये 20 जिलेटीनच्या कांड्या आणि एक निनावी पत्र होतं ज्यामध्ये ‘ही फक्त झलक आहे’, असा उल्लेखही करण्यात आला होता. मनसुख हिरेन हे या गाडीचे मालक असल्याचं पोलिस तपासात समोर आलं होतं.

हिरेन मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरे गेले होते. गाडी चोरीला गेल्याची तक्रारही त्यांनी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मनसुख काल रात्रीपासूनच बेपत्ता असल्याची माहिती होती. मात्र आज हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानं या प्रकरणाला वेगळं वळणं लागलं आहे.

दरम्यान या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच केली आहे. घटनेच्या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या असून गाडी ओळखल्याबरोबर श्री सचिन वझे ( पोलिस अधिकारी ) घटनेच्या ठिकाणी सर्वात आधी पोहचले होते. ज्यांची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद चालू असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला होता. मात्र आता गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचाच संशयास्पद मृत्यू झाल्यानं नक्की या प्रकरणात पुढे काय समोर येणार हे अद्याप सांगता येणार नाही.

थोडक्यात बातम्या – 

धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली – पंकजा मुंडे

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌नवऱ्याने ‌व्हाॅटसअॅपला तिचा डीपी न ठेवल्याने पत्नीने केलं असं काही की….

नोकरीची सुवर्णसंधी; RBI मध्ये ‘इतक्या’ पदांची भरती सुरू

‘ये मैं हूं, ये मेरा घर और ये मेरा पोछा है…’; राखीने शेअर केला बाथरूममधील व्हिडीओ

“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More