बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! विद्यापीठाच्या आवारातच पाहत होते शिक्षक आणि कर्मचारी पॉर्न फिल्म

भोपाळ | नॅशनल नॉलेज नेटवर्कने ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली की, त्यांच्या विद्यापीठात 8 यूजर आयडीवरुन 2 दिवसांत जवळपास 21 तास पॉर्न वेबसाईट सर्च करण्यात आल्या आहेत. प्रत्येक दिवसाचा हिशेब काढल्यास दिवसाला 179 मिनिटे फक्त वेबसाईट सर्च केल्या गेल्या नाही तर त्यावर थांबून कंटेन्टही पाहिला गेला आहे. एवढंच नाही तर या कर्मचाऱ्यांनी आपल्या फोनमध्ये पॉर्न फिल्म्सही डाऊनलोड केल्याची माहिती एन.के.एनने दिली आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातून धक्कादायक बाब समोर आली आहे. या विद्यापीठ परिसरात शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह एकूण 8 जण पॉर्न फिल्म पाहत असल्याचं समोर आलं आहे. या 8 जणांपैकी 2 महिला आहेत, तर एक 58 वर्षाचा जेष्ठ व्यक्ती आहे. या प्रकाराची माहिती सगळीकडे पसरल्यानंतर विद्यापीठात एकच खळबळ उडाली होती. विद्यापीठाची प्रतिमा खराब होत असल्यामुळे विद्यापीठाने 2 महिलांसह 4 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात स्थायी कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

विद्यापीठ परिसरात पॉर्न फिल्म पाहणाऱ्या 8 कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये 2 व्यक्तींचं वय 58 वर्षाच्या जवळपास आहे. ते आता सेवानिवृत्तीला आले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देताना काही कर्मचाऱ्यांनी आपण दुसरी वेबसाईट सर्च करत होतो, तेव्हा अचानक पॉर्न वेबसाईट आपोआप ओपन झाल्या, असं सांगितलं आहे. या प्रकारच्या वेबसाईट सर्च करणाऱ्यांमध्ये 2 महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

या प्रकारानंतर विद्यापीठ प्रशासनाने कठोर पाऊल उचललं आहे. विद्यापीठाने सर्व्हिस प्रोव्हायडरचे 4 कर्मचारी कपिल सेन, अनुराग शर्मा आणि दोन महिलांना कामावरुन काढून टाकलं आहे. तर हीरेंद्र या शिक्षकाला कम्प्यूटर सायन्स डिपार्टमेंटमधून कमी केलं आहे. तर स्थायी कर्मचारी रिशेष रजक याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

थोडक्यात बातम्या

संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का- नाना पटोले

“तक्रार करणाऱ्यांचा आणि माझा इतिहास तपासा, गेली 25 वर्ष मी संसदेच्या क्षेत्रामध्ये काम करतोय” – अरविंद सावंत

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्काॅर्पिओनंतर त्याच ठिकाणी दुचाकी सापडल्यानं खळबळ

मनसुख हिरेन यांचा सचिन वाझेंच्या गाडीत बसतानाचा व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ

रश्मी शुक्लांनी भाजपमध्ये राहण्यासाठी ‘या’ आमदारावर आणला दबाव; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More