बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! अन् पूराच्या पाण्यात चक्क ब्रिज वाहून गेला, पाहा व्हिडीओ

भोपाळ | मुसळधार पावसाच्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे अनेकांची घरं पाण्याखाली गेली. अनेकांना आपला जीव गमावला लागला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. अशातच आता तुडुंब भरलेल्या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे आलेल्या पुरात ब्रिज वाहून गेले असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.

मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील ही घटना असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून नदीवर असणारा ब्रिज एका क्षणात कोसळला आणि वाहून गेल्याचं दिसत आहे. या वाहून गेलेल्या ब्रिजचा हा धक्कादायक व्हिडीओ सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

ब्रिज वाहून गेल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातारण निर्माण झालं आहे. व्हिडीओमधूनही हे धक्कादायक दृश्य दिसून येत आहे. ही ब्रिज दातिया जिल्ह्याला दुर्गा मंदिर असणाऱ्या रतनगड शहराशी जोडला गेला असल्यानं आता तेथील नागरिकांचेही हाल होत आहे. 2009 साली हा ब्रिज बांधण्यात आला होता. 

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांनी संकटांना तोंड द्यावं लागत आहे. यातच मध्य प्रदेशातल्या जवळपास 1177 गावांना मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे.

थोडक्यात बातम्या –

 अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी गहना वशिष्टला कोर्टाकडून आणखी एक झटका!

मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणात एनआयएचा धक्कादायक दावा!

शिल्पा शेट्टीला अभिनेता आर. माधवनचा पाठिंबा, म्हणाला…

“अमित शहा संसदेत आले, तर मी टक्कल करेन आणि तुमच्या कार्यक्रमात येईल”

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाचा राज्यांना सतर्कतेचा इशारा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More