बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! अंत्यसंस्कार केल्याच्या 15 दिवसांनंतर पुन्हा घरी परतली मृत महिला

हैदराबाद | आंध्रप्रदेश येथे सर्वांना हैराण करणारी घटना घडली आहे. कोरोनाकाळात लोक मरत असताना येथील एका महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर 15 दिवसांनी ती पुन्हा घरी परतली. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमधील महिलेला पुन्हा समोर पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

संबंधित मृत महिलेचं नाव गिरीजम्मा असं आहे. गिरीजम्मा यांना 12 मे रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना विजयवाडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. बायकोला दाखल केल्यानंतर त्यांचे पती गदय्या घरी परतले. 15 मे ला आपल्या पत्नीच्या तब्येतीबाबत विचारपूस करायला ते रुग्णालयात गेले, त्यावेळी त्यांच्या पत्नी गिरिजम्मा त्या वॉर्डमध्ये नव्हत्या.

गिरिजम्मा यांना सगळ्या वॉर्डात शोधूनही त्या सापडल्या नाहीत. अखेर रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी त्यांना शवागारात पाहायला सांगितले. गदय्या यांनी शवगृहातील मृतदेह हा आपल्या पत्नीचा असल्याची ओळख सांगितली. ओळख पटल्यावर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्रही दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कार केले. 23 मे रोजी गदय्या यांचा मुलगा रमेश याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

दरम्यान, गदय्या यांनी त्यांचा मुलगा रमेश याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर बायको आणि मुलाला श्रद्धांजली वाहण्यासाठी एका शोकसभेचं आयोजन केलं होतं. ही शोकसभा सुरू असताना तिथे एक महिला आली. तिला पाहिल्यानंतर सगळेजण हादरले होते, कारण ती महिला गिरीजम्मा होती. तिची विचारपूस केल्यानंतर गदय्यांना कळालं की त्यांनी भलत्याच महिलेवर अंत्यसंस्कार केले.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाने हिरावलं आई-बाबांचं छत्र, ‘या’ जिल्ह्यात तब्बल 34 मुले झाली पोरकी

हाताने पकडायला गेली भलामोठा साप अन्…; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

“शरद पवार गॉडफादर, मग ठाकरे सरकारच्या निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच”

जीमचा प्रभाव पाहण्यासाठी महिलेनं काढले तसले फोटो, अन् चुकून घडला धक्कादायक प्रकार

‘पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं’, गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More