बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! बापानेच अल्पवयीन मुलांच्या डोक्यात दगड घालून केली हत्या त्यानंतर…

लखनऊ | उत्तरप्रदेशमधील झांसी येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका वडिलांनी स्वतःच्याच लेकांची हत्या केली. एवढच नाही तर त्यानंतर दोन्ही लेकांचे मृतदेह विहरीत टाकून दिले. इतकं करूनही त्यानंतर जे केलं ते देखील अत्यंत धक्कादायक होतं. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित वडिलांचं नाव रहिश असं असून त्यांना दोन अल्पवयीन मुलं आहेत. यातील 12 वर्षांचा असलेल्या मुलाचं नाव हर्ष असं आहे तर 9 वर्षाच्या दुसऱ्या मुलाचं नाव अंश असं आहे. रहिश यांना दारुचं व्यसन होते. याकारणामुळे रहिश आणि त्यांच्या पत्नीमध्ये सतत भांडण होत असे. शनिवारी रहिश यांचं त्यांच्या पत्नीसोबत जोरात भांडणं झाली. त्यानंतर रहिश यांनी आपल्या दोन्ही मुलांना नवीन कपडे आणू असं सांगून त्यांना बाजारात नेलं.

दरम्यान, बाजारात जात असतानाच रहिश यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. एवढच नाही तर त्यानंतर दोघांचे मृतदेह त्यांनी शेजारील विहरीत फेकून दिले. हा प्रकार यावरच थांबला नाही. त्यानंतर रहिश यांनी त्यांचा स्वतःचा गळा चिरुन विहरीत उडी मारुन आत्महत्या केली. रात्र झाली तरी पती आणि मुलं घरी आले नाहीत म्हणून रहिश यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास चालू केला.

दरम्यान, शोध घेत असताना रस्त्यात रक्ताने माखलेला एक दगड आढळल्याने शेजारील विहरीत पाहणी करण्यात आली. यावेळी दोन्ही मुलांचे मृतदेह विहरीत तरंगताना अढळून आले. याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. तसेच आता पोलीस  प्रकरणाचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

रुग्णालयाची खिडकी तोडून अडाणी चोरट्यांनी कोरोना लस समजून नेले ‘हे’ 25 लसींचे डोस

धडकी भरवणारा अपघात! चेकपोस्ट टाळण्यासाठी केलेल्या स्टंटबाजीने एकाचा जागीच मृत्यू, पाहा व्हिडीओ

“सगळा गाढवपणा हा सरकारनं केला आहे अन्…”; विनायक मेटेंचा राज्य सरकारवर घणाघात

दहावी परीक्षेच्या निर्णयाबाबत राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम; लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता

कौतुकास्पद! हॉस्पिटलमधील पगाराची नोकरी सोडून स्मशानात करते असं काम की तुम्हालाही वाटेल अभिमान

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More