बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन मुलांच्या बापाने केलं असं काही की कोर्टाने सुनावली 212 वर्षांची शिक्षा!

वॉशिंगटन | लाॅस एंजिल्समधील एका आरोपीला सर्वात जास्त दिवसांची शिक्षा देण्यात आली आहे. या आरोपीला तब्बल 212 वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली आहे. ही घटना अमेरिकातील लाॅस एंजिल्स मधली असून संबंधित आरोपीचं नाव अली अल्मेजायन असं आहे. या आरोपीला एक 13 वर्षांचा तर दुसरा 8 वर्षांचा, असे दोन मुलं होते. मात्र 2015 मध्ये त्याच्या मुलांचं निधन झालं.

लाॅस एंजिल्स पोर्ट जवळ 2015 मध्ये या आरोपीने त्याची कार पाण्यात बुडावली. यादरम्यान कारमध्ये त्याची पत्नी आणि दोन मुलं देखील होते. पाण्यात गाडी बुडाल्यानंतर आरोपी पोहत बाहेर आला मात्र मुलांना आणि पत्नीला गाडीतच सोडलं. दोन मुलं गाडीत अडकली असल्याने दोघांचा ही मृत्यू झाला तर मासे पकडणाऱ्या लोकांनी त्याच्या पत्नीला बाहेर काढलं.

विमा मिळवण्यासाठी या वडिलांनी स्वतःच्याच लेकरांची निर्दयीपणे हत्या केल्यानंतर एक्सीडेंटल डेथ इन्शूरन्सच्या क्लेमच्या रुपात त्याला 1 कोटी 88 लाख रुपये मिळाले. हा आरोपी इजीप्तचा रहीवासी असून त्यानंतर त्याने  इजीप्तमध्ये एक बोट आणि जमीन घेतली. या हत्येला त्याने अपघात दाखवण्याचा लाख प्रयत्न केला होता. मात्र तो यात अयशस्वी ठरला.

दरम्यान, संपुर्ण प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षा सुनावताना डिस्ट्रीक्ट कोर्टचे न्यायाधीश जाॅन वाॅल्टर यांनी आरोपी अलीला एक लालची आणि निर्दयी मारेकरी म्हटलं आहे. एवढचं नाही तर आरोपीला इन्शुरन्स कंपीनीचे 1 कोटी 88 लाख देखील परत करण्याचा आदेश दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

पुढील दोन दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या कारण!

‘या’ भाजप खासदाराच्या सुनेनं कापली हाताची नस, केले ‘हे’ धक्कादायक आरोप

बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार संभाजी पवार काळाच्या पडद्याआड

काय सांगता! भर सोहळ्यात अभिनेत्रीनं काढले रक्ताळलेले कपडे अन्….

सचिन वाझेंना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला- संजय राऊत

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More