बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ; डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी रुग्ण पुन्हा कोरोना पाॅझिटिव्ह

बीड | देशात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला कोरोना संसर्ग कमी होताना दिसत होता. मात्र दुसऱ्या लाटेने देशभर धुमाकूळ घातला आहे. यामुळे रुग्णसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच बीड येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका रुग्णाला डिस्चार्ज देताच दुसऱ्या दिवशीच तो पुन्हा कोरोना पाॅझिटिव्ह अढळ्याने  एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित घटना ही बिड जिल्ह्यातील धारुर येथील आहे. येथे रहिवासी असणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्याला रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. मात्र काही दिवसांनी त्याचा अहवाल नेगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर संबंधित रुग्ण हा एका चोरीच्या प्रकरणात आरोपी होता.

पोलिसांनी रुग्णासोबत आणखी दोन जणांना ताब्यात घेतलं होतं. हे तिघेही एका चोरीच्या प्रकरणात आरोपी होते. यावेळी पोलिसांनी आरोपींची कोरोना चाचणी केली होती. अशातच डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णााचा कोरोना अहवाल पुन्हा पाॅझिटिव्ह आल्याने पोलीस देखील हैराण झाले असून आता आरोग्य विभागाच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दरम्यान, कोरोना महामारीत अनेकांनी आपली जवळची नाती गमावली आहेत. अशातच बुलडाणामधील एकूण 34 मुलं देखील कोरोनामुळे पोरकी झाली आहेत. एवढंच नाही तर आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

यंदा पायी वारी झालीच पाहीजे, आम्ही तडजोड स्वीकारणार नाही- तुषार भोसले

तुमच्या जिल्ह्यात काय सुरू अन् काय बंद? ; वाचा संपुर्ण महिती

जवान देवदूतासारखे धावून आले अन् लोकलखाली जाता जाता वाचला प्रवासी, पाहा व्हिडीओ

कोरोनासारखी संकटे पुढेही येऊ शकतील- नरेंद्र मोदी

नोकरीची सुवर्णसंधी; कोकण रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More