बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! महाराष्ट्रात महापुरामुळे बळी पडलेल्यांचा आकडा 137 वर

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस दडी मारून बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच आता पावसाने पुन्हा एकदा जोमाने बरसायला सुरूवात केली आहे. पावसाने पुन्हा बॅटिंग सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातील कोकणासह विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांना पुर आला आणि अनेक गावं पाण्याखाली गेली तसेच नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गावच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकणच्या दौऱ्यावर आहेत. कोकणसह मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्येही महापुरामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. कालपर्यंत महाराष्ट्रात दरडी कोसळल्याने व महापुरामुळे 80 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली होती.

आता महाराष्ट्रात महापुरामुळे झालेल्या बळींचा आकडा वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या महाराष्ट्रात 137 नागरिकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 73 जण बेपत्ता आहेत. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

दरवर्षी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीवर सरकारने दूरगामी विचार करून नागरिकांचं स्थलांतर करून त्यांना कायमचं सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे. तसेच या पुरग्रस्त जिल्ह्यांमध्ये रिस्क असेसमेंट करण्याची गरज असल्याचंही त्यांनी बोलुन दाखवलं होतं.

थोडक्यात बातम्या

मुंबईकरांनी करून दाखवलं; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

“गाडी चालवत पंढरपुरला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्याही पाहाव्यात”

27 जुलैबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

भास्कर जाधवांना एवढा माज कसला?, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More