बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! 10 मिनिटांच्या अंतरात नर्सनं महिलेला दिले चक्क 3 लसीचे डोस

ठाणे | महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळाला. पण आता हळूहळू दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही आटोक्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच देशभरात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी लसीकरणाविषयी बेजबाबदारपणा होत असल्याचं आढळून येत आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदरील आनंदर लसीकरण सेंटरवर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यात लसीकरण सेंटरमध्ये परिचारिकेनं 10 मिनिटांच्या अंतरानं एका एका महिलेला चक्क 3 लसीचे डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर येत आहे. एकापाठोपाठ तीन लस दिल्यामुळं या महिलेला डॉक्टरांच्या नजरेखाली ठेवण्यात आलं.

प्रसार माध्यमांनीही आयुक्त विपीन शर्मा यांना विचारलं असता, मी यावर काहीच बोलू शकत नाही, असं म्हणत आयुक्तांनी प्रसार माध्यमांशी बोलणं टाळून तिथून निघून गेले.

दरम्यान, याबद्दल महिलेनं परिचारिकेला विचारणा केली, पण तिनं काहीच उत्तर दिले नाही. कोविड सेंटरवरून बाहेर पडल्यानंतर या महिलेनं या विषयी स्थानिक नगरसेविकेशी संपर्क साधला आणि संपूर्ण हकिकत सांगितली. त्यानंतर या नगरसेविकेने महानगरपालिकेच्या डॉक्टरांना याबाबत जाब विचारला, मात्र तरी देखील याबाबत ठाणे महापालिकेनं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

थोडक्यात बातम्या – 

‘बिग बॉस 15’ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन, म्हणाली….

‘आमच्या आमदाराला त्रास देत असतील तर…’; शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

‘नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे’; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

62 वर्षीय व्यक्तीनं केली डेल्टा प्लस व्हेरिएंटवर मात, अनुभव सांगताना म्हणाला…

“देवेंद्र फडणवीस खोटं बोलण्याचं मशीन, चार महिन्यात आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनीच ओबीसींचं आरक्षण काढलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More