बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पुण्यातील ढोल-ताशा पथकाला हैदराबादेत डांबलं, 15 मुलींचाही समावेश

पुणे | पुण्याचा गणेशोत्सवासोबतच पुण्याचे ढोलताशाचे पथक हे देशभरात प्रसिद्ध आहेत. पण, पुण्याच्या ढोलताशा पथकासोबत डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील ओमस्वामी प्रतिष्ठानचा ढोलताशा पथक मागील आठवड्यात वादनासाठी हैदराबादला गेले होते. हैदराबादच्या प्रेमचंद यादव यांनी चार दिवसाच्या वादनासाठी अडीच लाख रूपयांच्या वादनाची सुपारी दिली होती. त्यानुसार पथक वादनासाठी हैदराबादला रवाना झालं.

15 मुली आणि इतर मुलांसह पथकाने चार दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वादन केलं. चार दिवसांच्या वादनानंतर सुपारीत ठरल्याप्रमाणे पथकाने पैश्यांची मागणी केली. पण पथकाला आणखी दोन दिवस वादन करण्यास सांगितलं. त्यानंतर दोन दिवस वादन झालं. तेथील लोकांंनी 23 सप्टेंबरला वापस पुण्यास येताना पथकाला पैसे देण्यास टाळाटाळ करत वाहनांचे कागदपत्रे काढून घेतले. तसेच आणखी दोन दिवस वादन करा म्हणत वाद घालण्यास सुरूवात केली. मात्र, पथकाने वादनास नकार दिला.

प्रेमचंद यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्ही मुलांना जाऊ देणार नसल्याची भूमिका घेत पथकाची अडवणूक केली. पथकातील मुलं व मुली घाबरल्याने त्यांनी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशी आणि मनसेच्या रूपाली ठोंबरे यांच्यासोबत संपर्क केला. त्यानंतर परदेशी यांच्यासह ठोंबरें यांनी तात्काळ स्थानिक नगरसेविका बसेरिया पुजारी यांच्याशी संपर्क साधत संबंधित प्रकार त्यांच्या कानावर घातला. तसेच पोलीसांत तक्रार केली.

दरम्यान, सिकंदराबाद पोलिसांसह नगरसेविका पुजारी यांनी पथकासोबत संपर्क करत भेट घेतली. तसेच त्यांना धीर देत पथकाची सुटका केली. पथकाला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यानंतर यादव यांना बोलवून पोलिसांनी आणि पुजारी यांनी यात तडजोड करत पैसे मिळवून दिले. त्यानंतर आज सुखरूप पुण्यात पथकातील सर्व पोहचले आहेत. पण, या पथकाला दोन लाख कमी मिळाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

थोडक्यात बातम्या –

भारताचं ‘ते’ जुनं स्वप्न होणार लवकरच पूर्ण! जो बायडन यांच्याकडून भारताचं तोंडभरून कौतूक

भाजपा युवा मोर्चाचे राजेश टोपेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

दिल्ली पुन्हा अव्वल! भेदक गोलंदाजीने राजस्थानला 33 धावांनी धूळ चारली

‘या’ तीन राज्यांना ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्राला देखील अलर्ट जारी

नरेंद्र मोदींच्या संपत्तीत ‘इतक्या’ लाखांची वाढ; वाचा नक्की किती आहे संपत्ती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More