बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन सुन्न करणारी घटना! नवजात बालकाचा उंदराने कुरतडला पायाचा अंगठा, रूग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर 

नवी दिल्ली |  देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. आरोग्य विभाग मोठ्या हिमतीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. मात्र काही ठिकाणच्या घटनांमुळे रूग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे. या काळात रूग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाने अनेकांना आपला प्राण गमवावा लागल्याच्या अनेक घटना कानावर आल्या. अशातच भयंकर प्रकार समोर आला आहे.

मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका सरकारी रुग्णालयामध्ये उंदराने बाळाचा पाय कुरतडल्याचा प्रकार घडला आहे. बाळाची टाच आणि अंगठा उंदराने कुरतडल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एक समिती स्थापन केल्याची माहिती मिळत आहे.

ज्या बाळासोबत हा प्रकार घडला आहे त्या बाळाचा जन्म नियोजित वेळेआधी झाला. बाळाचं वजन 1.4 किलो इतकं आहे. त्यामुळे त्या बाळाला उष्ण काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं होतं. जेव्हा बाळाची आई सकाळी दुध पाजण्यासाठी गेली तेव्हा तिने बाळाच्या पायाला झालेल्या जखमा पाहून तिला धक्काच बसला. त्यानंतर तिथं असणाऱ्या आरएसओला अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं. सर्जनने बाळाची तपासणी केली. त्यावेळी बाळाचा पाय उंदराने कुरतडल्याचं स्पष्ट झालं. याबाबत एकाहिंदी वेबसाईटने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, आमच्या रुग्णालयामध्ये लहान मुलांची देखभाल करण्यासाठी जो कक्ष आहे तिथे एका बाळाचा पाय उंदाराने कुरतडल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळाची टाच आणि अंगठा उंदराने कुरतडला असून या प्रकरणाच्या तपासाचे आदेश देण्यात आले असल्याचं महाराजा यशवंतराव चिकित्सालयाचे अधीक्षक ठाकूर यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली विवाहबंधनात, पाहा फोटो

आनंदाची बातमी! पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्र्यांकडे प्रेयसीचं लग्न थांबवण्याची मागणी करणाऱ्या तरुणाची ‘ती’ प्रेयसी आली समोर म्हणाली…

“उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More