Top News ठाणे महाराष्ट्र

धक्कादायक! पाण्याच्या टाकीत आढळला 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह

भिवंडी | भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समरूबाग परिसरातील इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीत एका 7 वर्षीय चिमुकल्याचा सांगाडा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

फारुकी अब्दुल अहद तंजुद्दीन असं मृतदेह सापडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. हा चिमुरडा नोव्हेंबर महिन्यापासून बेपत्ता होता.  त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

पालकांनी 25 नोव्हेंबर रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरू असताना गुरुवारी रात्री समरूबाग परिसरातील इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आला.

निकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटना स्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या सात वर्षीय फारुकीचा असल्याची ओळख पटली. नक्की त्याचा मृतदेह टाकीत कसा आला याचा तपास पोलीस घेत आहे.

थोडक्यात बातम्या-

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, 2 बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार

राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे- राजेश टोपे

ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब आहे- देवेंद्र फडणवीस

मला महिलांच शरीर आवडतं, पण डोकं नाही- राम गोपाल वर्मा

नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या