बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! म्हाडा पेपर फोडण्यासाठी ‘या’ खास कोडवर्डचा केला वापर

मुंबई | म्हाडा पेपरफुटीवरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी राज्य सरकरावर त्यांच्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. अशातच याप्रकरणी आणखी एक बातमी समोर आली आहे.

म्हाडा पेपर फोडण्यासाठी ओरोपींनी खास कोडवर्डचा (Code word) वापर केला असल्याचं समोर आलं आहे. म्हाडाचे पेपर मिळवण्यासाठी कोडवर्डचा वापर झाल्याचं समजतंय. म्हाडा पेपर फोडण्यासाठी वापरण्यात आलेला कोडवर्ड हा घर आणि वस्तू होता.

खास कोर्डवर्ड घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असा त्या शब्दांचा वापर होता. आरोपींकडून फोनवरून कोडवर्डच्या वापर करत पेपर घेत असल्याचं तपासात समोर आलंय. आरोपींच्या मोबाईलवर रात्री उशिरापर्यंत अनेकांचे फोन येत होते. त्यामुळे हे फोन नेमके कोणाचे आहेत, त्यातील कुणी आरोपी आहेत का याचा तपास केला जाणार आहे.

दरम्यान, म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी (MHADA Exam) पुण्यात दोन दिवसांपूर्वी मोठी कारवाई करण्यात आली. म्हाडाच्या परीक्षा संदर्भात काही जणांनी मध्यस्थांना पैसे दिल्याचे माझ्या कानावर आले आहे. तुम्ही ज्याही कोणत्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते हक्काने परत घ्या, असे ट्विट देखील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

आज इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘….तर अशांना महाराष्ट्र सरकार खपवून घेणार नाही’; सुप्रिया सुळे आक्रमक

बेशिस्त वाहनचालकांना प्रशासनाचा चपराक; आता नियम मोडले तर..

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा मोठा खुलासा, म्हणाली…

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी Omicron मुळे पहिला बळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More