बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! नवरा रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत असल्यामुळे नाराज होऊन बायकोने….

नवी दिल्ली | पती रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत असल्याकारण पत्नीने नाराज होऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मध्यप्रदेश मधील इंदौर येथील आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इंदौर येथील लसूडिया परिसरात रात्री सुमारे 3 वाजता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ वर्षाच्या महिलेने तिच्या पतीला टीव्ही बंद करण्यास सांगितला. मात्र पतीने टीव्ही बंद न केल्यामुळे पत्नी नाराज होऊन दुसऱ्या रुममध्ये गेली. रात्री 3 वाजता पतीला जाग आल्यानंतर तो रुममध्ये गेला. त्यानंतर आपल्या पत्नीला लटकलेल्या अवस्थेत पाहून पतीच्या पाया खालची जमीन सरकली.

पतीवर नाराज झालेल्या महिलेने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. त्यानंतर पतीने खुप हिंमत करुन कसतरी तिचं शव खाली उतरवलं. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मृत महिलेच्या पतीचं नाव अर्जुन मराठा असं आहे.

दरम्यान, या प्रकणाबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एवढचं नाही तर पतीच्या जबाबानंतरच पुढील कारवाई केली जाईल. पोलिसांच्या मते ही आत्महत्या आहे की हत्या याचा देखील शोध घेण्यात येईल.

थोडक्यात बातम्या-

“सोनिया गांधी राजकारणात सक्रिय नाहीत, ‘यूपीए’ला सक्षम करण्यासाठी शरद पवारांनी नेतृत्व करावं”

“रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षापासून विकास डाऊन”

धक्कादायक! कोरोनाची लक्षणे दिसल्याने थेट तापी नदीत उडी घेत शिक्षकाची आत्महत्या

‘कोरोना रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून…’; ‘या’ मराठी अभिनेत्रीने केला संताप व्यक्त

मास्क नाही घातलं म्हणून केली चौकशी, चिडलेल्या महिलेने केली पालिका कर्मचारिकेची पिटाई, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More