Top News देश

नवरीसारखा श्रृंगार करत आपल्या पोटच्या मुलांसोबत महिलेने केलं धक्कादायक कृत्य!

मध्य प्रदेश | मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेनं नवरी सारखा श्रृंगार करुन आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या करुन, स्वत: आत्महत्या केली. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

ही महिला अंगणवाडीत सहाय्यक म्हणून काम करतं होती. मिळालेल्या माहितीनूसार या महिलेनी आपल्या 6 आणि 3 वर्षांच्या मुलांना गळफास देऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या करुन स्वत:ला संपवलं.

पोलिसांच्या तपासादरम्यान हाती लागलेल्या माहितीनूसार, दोन महिन्यांपूर्वी मृत महिलेची प्रस्तुती झाली होती. परंतू जन्माला आलेल्या बाळाचा दोन महिन्यांनंतर मृत्यू झाला. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मृत महिलेनी या घटनेचा मोठा धस्का घेतला होता.

दरम्यान, त्या तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून, ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच या आत्महत्येमागचं नेमक कारण स्पष्ट झालं नसून, पोलिस त्याचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

‘मी हाडाचा शेतकरी आहे’; वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करणाऱ्या दानवेंवर कडूंनी साधला निशाणा

‘हिंमत असेल तर भाजपने राष्ट्रगीत बदलून दाखवावं’; ममता बॅनर्जींचं भाजपला आव्हान

“कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलं”

….म्हणून मी हाडाचा शेतकरी आहे बनावट नाही- रावसाहेब दानवे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या