Top News पुणे महाराष्ट्र

धक्कादायक! महिलेने केला दीड वर्षाच्या बाळाला पळवण्याचा प्रयत्न

बारामती | बारामती शहरामध्ये एका महिलेने दीड वर्षाच्या लहान मुलाला पळवण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील भरवस्तीत हा प्रकार घडला असल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास आजोबा आपल्या दीड वर्षाच्या नातवाला घराबाहेरील अंगणात खेळवत होते. अचानाक त्याठिकाणी एक महिला आली आणि तिने ते बाळ त्यांच्या हातातून हिसकावून घेतले. त्यावेळी त्या बाळाला वाचवण्याकरता प्रयत्न करणाऱ्या आजोबांसह तेथील नागरिकांनाही ती महिला दगड मारत होती. त्या महिलेचा हा प्रयत्न पोलिसांच्या तत्परतेमुळे फसला.

हरुन मलंग झारी यांचा दीड वर्षाचा नातू आहाद यास जयपाल विराज पवार या महिलेने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. हरुन यांनी प्रसंगावधान बाळगत आरडा-ओरडा केला. त्यामुळे स्थानिक नागरिक तेथे जमा झाले. त्याच दरम्यान तेथील नागरिकांनी पोलिसांना फोन करुन घडलेल्या घटनेबाबत कळवले. पोलिसांनी कोणताच वेळ न दवडता जयपाल विराज पवार या महिलेला आपल्या ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, हरुन यांनी त्या महिलेविरोधात तक्रार नोंदवली असून या अपहरणाचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. त्याचा शोध पोलिस घेत असल्याची महिती पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील युवा अभिनेत्याचं निधन

“कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल”

‘सुशांतच्या फार्महाऊसवर रियाच्या आधी येत होती ही अभिनेत्री’; फार्महाऊस मॅनेजरचा धक्कादायक खुलासा

…म्हणून 10 सरकारी पाठशाला कायमस्वरूपी बंद; शालेय शिक्षण विभागाच निर्णय

‘…यासाठीही हिरोसोबत झोपावं लागतं’; कंगणाचा पुन्हा जया बच्चन यांच्यावर निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या