बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! मुलाला घेऊन घरी जात होती महिला अन् अचानक कारवर येऊन कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ

वाॅशिंग्टन | कुणाचा मृत्यू कधी आणि कसा कुणावर ओढवेल हे सांगता येत नाही. कुणाला कुठेही-कधीही मरण येऊ शकतं. याचंच प्रत्यय असलेला एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एक कार रस्त्याने जात होती आणि अचानक एक विमान कारवर येऊन कोसळतं त्यानंतर मोठा धमाका होतो.

ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडातील आहे. येथील पेमब्रोक पाइन्स स्थित नॉर्थ पेरी एअरपोर्टहून या विमानाने उड्डाण घेतलं होतं. काही वेळानेच हे विमान रहिवाशी भागातील एका रस्त्यावर येऊन थेट एका कारवर येऊन कोसळलं. जेव्हा हे विमान पडलं तेव्हा एक महिला कारने आपल्या चार वर्षीय मुलाला घरी घेऊन जात होती.

विमान नेमकं या कारवरंच येऊन कोसळलं. त्यानंतर विमान जमिनीवर आदळलं आणि नंतर त्याने पेट घेतला. ‘इंडिया टाइम्स’च्या वृत्तानुसार या कारमध्ये जो चार वर्षांचा मुलगा होता त्याला आणि त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, मुलाला उपचारादरम्यान मृत्यूने कवटाळलं.

दरम्यान, विमान चालवत असलेल्या पायलटचा आणि एका प्रवाशाचाही या अपघातात मृत्यू झाला. या अपघातात कारमधील महिला वाचली आहे. सध्या ती हॉस्पिटलमध्ये असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही महिला शिक्षिका आहे. महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. तुम्ही तुमचा दिवस संपवून आपल्या मुलासोबत जात असता आणि रस्त्यात ही घटना घडते. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. विमान खाली कसं पडलं हे अद्याप समजलं नाहीये.

थोडक्यात बातम्या –

गृहमंत्र्यांची खुर्ची सेफ, मुंबईच्या पोलीस आयुक्तांची मात्र उचलबांगडी

गृहमंत्र्यांची खुर्ची सेफ, मुंबईच्या पोलीस आयुक्तांची मात्र उचलबांगडी

कोरोना लसीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

धक्कादायक! पोटच्या मुलाने जन्मदात्या आईवर उचलला हात, सहन न झाल्याने माऊलीने सोडला प्राण, पाहा व्हिडीओ

‘सिंघम’ मधील काजल अग्रवालचं हॉट फोटोशूट, पाहा तिचे अदाकारी फोटोझ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More