बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच पोलिसांनी केली मारहाण

औरंगाबाद | औरंगाबादच्या पोलीस स्थानकात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या तरूणालाच पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. डोकं फुटलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेला असताना पोलीस कॉन्स्टेबलने बेदम मारहाण केल्याचा आरोप या तरूणाने केला आहे.

औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. जखमी पीडित सुनील मगर डोकं फुटलेल्या अवस्थेत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र तक्रार दाखल करण्याऐवजी पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांनीच त्याला बेदम मारहाण केल्याचं सुनील मगर या तरूणाने सांगितलं आहे.

जखमी तरुण सुनील मगर आणि सोनू घुरी या दोघांमध्ये कुठल्यातरी गोष्टीवरून वाद झाला होता. हा वाद मारामारीपर्यंत गेला. त्यात सुनील मगरचं डोकं फुटलं. त्यानंतर सुनील तक्रार नोंदवण्यासाठी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र, पोलिसांनी सुनीलचं काहीही ऐकून घेण्यास नकार दिला. आरोपी सोनू घुरी आणि पोलीस कर्मचारी दीपक जाधव यांनी हातमिळवणी केल्याचा आरोप सुनील मगर याने केला आहे. त्यातूनच आपल्याला मारहाण केल्याचं पीडित तरुणाने सांगितलं आहे. जखमी तरुणाच्या कुटुंबालाही मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, पोलीस कर्मचारी दीपक जाधव यांनी सुनीलला केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यामुळे आता पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन!

खळबळजनक! दिल्लीत भाजप नेत्याने गळफास घेत केली आत्महत्या

“नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”

पार्थ पवारांनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

“मोदी बांगलादेशात जाऊन आले पण त्यामुळे तेथील हिंदू अधिक असुरक्षित झाला”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More