बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! ‘या’ अभिनेत्रीच्या घरात होतं भूत, समोर आला चित्तथरारक प्रकार

मुंबई | नवोदित सिनेअभिनेत्री आलायाने एक मोठा थरारक खुलासा केला आहे. यामध्ये तिने तिच्या घरी भूत असल्याचं सांगितलं आहे. एवढंच नाही तर यानंतर तिने तिच्यासोबत असं काहीतरी झाल्याचं सांगितलं आहे की, जे ऐकून कोणालाही घाम फुटेल. एवढंच नाही तर यावेळी तिला घरात देखील जावं वाटत नसल्याचं तिने सांगितलं आहे.

आलाया ही अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. तिने नुकतीच बाॅलिवूडमध्ये एंट्री मारली असून तिच्या पहिल्या चित्रपटामधूनच तिने लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मात्र आलायाने तिच्या घरात भूत होतं असं एका मुलाखतीच्या वेळी सांगितलं आहे. यावेळी ती न्यूयाॅर्कला अभ्यासासाठी गेली असताना ती ज्या घरात राहत होती, तिथेच भूत होत असं तिने सांगितलं आहे.

आलाया राहत असणाऱ्या घरात तिला अर्ध्या रात्री पावलांचे आवाज येत असल्याचं आलायाने सांगितलं आहे. तसेच कधी-कधी आपोआप शाॅवर देखील चालु व्हायचा आणि अशा अनेक भितीदायक गोष्टी घडत होत्या, असं आलायाने म्हटलं आहे. यावेळी आलायाने तिच्यासोबत झालेली एक घटना देखील सांगितली आहे.

दरम्यान, एकदा आलायाला लाईटच्या प्रकाशातून काहीतरी निघाल्यासारखं वाटलं आणि तिची अवस्था अशी झाली होती की, तु काही पाहिलंस का..? आणि ती स्वतःलाच म्हणाली, मी काही नाही पाहिलं. एवढंच नाही तर त्यावेळी तिला असं वाटलं की, काहीतरी तिला स्पर्श करून गेलं. यानंतर तिला घरी देखील जावं वाटतं नसल्याचं तिने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘100 कोटी घ्या अन् भाजपला विरोध करा’; आप आणि काँग्रेसची ‘या’ संताला ऑफर???

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 02 कोरोनाबाधितांचा मृत्यू

देवाची सावली! उद्यान एक्सप्रेससमोर झोपून देखील महिला जिवंत

सेमी फायनलचा वचपा काढण्यासाठी विराटसेना सज्ज; 11 शिलेदारांची यादी जाहीर!

आजोबा अरुण गवळीचा नातीला खेळवताना फोटो व्हायरल!

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More