बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधी पाॅर्न वेबसाईट त्यानंतर…; एकतर्फी प्रेमातून तरुणाने केल्या धक्कादायक गोष्टी!

मुंबई | अनेक तरुण एकतर्फी प्रेमात धक्कादायक गोष्टी करतात. तसेच नकार मिळाल्यानंतर तरुणींना त्रास देऊन बदला घेण्याचा प्रयत्न करतात. अशाचप्रकारे मालाड येथे सर्वांना हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एकतर्फी रोमिओने काही भलत्याच गोष्टी केल्या आहेत.

मालाड येथे 26 वर्षीय कुणाल अंगोलकर रहिवासी आहे. त्याच्या शेजारीच राहणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थीनीवर कुणालचं प्रेम आहे. कुणालला तरुणीचा मोबाईल नंबर मिळाला होता. त्यानंतर कुणालने अनेक वेळा तरुणीला प्रेमासाठी विचारलं. मात्र तरुणीने नकार दिल्याचा राग त्याच्या डोक्यात बसला.

तरुणीने नकार दिल्यानंतर कुणालने सेक्स टाॅय कंपनीमध्ये तरुणीच्या घराचा पत्ता दिला. त्यानंतर तरुणनीच्या घरी अनेक वेळा सेक्स टाॅय आले. एवढ्यावरच कुणाल थांबला नसून त्याने तरुणीचा मोबाईल नंबर देखील पाॅर्न वेबसाईटवर नोंदवला. त्यामुळे तरुणीला वारंवार वेगवेगळे फोन येऊ लागले. यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.

दरम्यान, आरोपीला शोधण्यासाठी सायबर सेलने 500 पेक्षा जास्त लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या वेबसाईटवर लक्ष ठेवलं. तसेच डिलेव्हरी बाॅयकडे तपास केल्यानंतर कुणाल दरवेळी आईडी बदलत असल्याचं समजलं. मात्र अखेर पोलिसांनी कुणालला ताब्यात घेतलं. तसेच आता कुणालला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! अमेरिकेत शाळा सुरू होताच ‘इतक्या’ लाख मुलांना कोरोनाची लागण

‘या’ भीतीमुळे अमरावतीमधील संपूर्ण गाव रात्रभर झोपलं नाही

पुण्यातील धक्कादायक घटना; नर्सचा ड्रेस परिधान करुन महिलेने पळवलं बाळाला

करदात्यांसाठी मोठी बातमी; इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

IND vs ENG: कोरोनाच्या भीतीमुळे वरिष्ठ खेळाडूचा पाचवी टेस्ट खेळण्यास नकार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More