नवी दिल्ली | सध्याचं जीवन धकाधकीचं होऊन गेलं आहे. लोकं रोजच्या कामात एवढे व्यस्त झाले आहेत की त्यांना आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला वेळ नाही. अशातच कितीही व्यस्थ असलेल्या जीवनात लोकं मोबाईलला मात्र विसरत नाही.
मोबाईलशिवाय जगणं हे अशक्यच झाल्यासारखं आहे. अनेकजण दिवसातील कितीतरी वेळ मोबाईल पाहण्यात घालवत असतील. लोकं वेळात वेळ काढून मोबाईलचा वापर करतात. काहीजण तर अगदी रात्री झोपेपर्यंत मोबाईल पाहण्याचं सोडत नाहीत. या सवयीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
रात्री जास्त वेळ मोबाईल वापरल्याने मेलाटोनिन नावाच्या हार्मोनची पातळी कमी होते. त्यामुळे तणावाची पातळी वाढते. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीही थकवा जाणवू शकतो. अतिमोबाईलचा वापर मानसिक आरोग्यावरही पहायला मिळतो.
दरम्यान, रात्री उशीरापर्यंत मोबाईल वापरल्यानं डोळ्यांवरही विपरीत परिणाम होत असल्याचं पहायला मिळतं. याशिवाय त्वचेवरही याचा गंभीर परिणाम दिसून येतो. रात्री उशीरापर्यंत मोबाईल वापरल्यावर मेंदुवरही त्याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे मोबाईलचा कमीत कमी वापर केला पाहिजे.
थोडक्यात बातम्या –
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट, डाॅक्टर म्हणाले…
प्रियंका गांधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, “वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी…”
…म्हणून सलमान आणि शेहनाजला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ
“मोदी सरकारने देशद्रोह केला आहे”; राहुल गांधींचे केंद्रावर गंभीर आरोप
एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा शेवटचा इशारा, म्हणाले…
Comments are closed.