बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! ‘या’ देशानं 11 दिवसांसाठी घातली हसण्यावर बंदी

उत्तर कोरिया | उत्तर कोरियाचा (North korea) सर्वेसर्वा किम जोंग (Kim Jong) उन त्याच्या क्रूरतेसाठी आणि विक्षिप्त वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. किम कधी काय निर्णय घेईल याचा काही नेम नसतो. मात्र त्याची सत्ता असल्यानं लोकांना त्याचे आदेश पाळावेच लागतात. अशातच आता त्याच्या नव्या आदेाशाची सर्वत्र चर्चा होत आहे.

माजी नेते किम जोंग इल यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर कोरियात शोक पाळण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर किम जोंगनं नवीन आदेश दिला असून याचं सक्तीनं पालन केलं जातय का नाही यासाठी लोकांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.

किम जोंग त्याच्या नवीन आदेशामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. हा आदेशानुसार जनतेनं 11 दिवस हसायचं नाही. किम जोंग इल यांच्या निधनाच्या स्मरणार्थ लोकांनी कोणत्याही प्रकारचा आनंद व्यक्त करू नये, असे सक्त आदेश सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दरम्यान, या काळात देशातील जनता हसू शकत नाही, खूश होऊ शकत नाही आणि दारूही पिऊ शकत नाही. जर नियमांचं उल्लंघन केल्यास वैचारिक गुन्हेगार म्हणून अटक करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘बलात्काराचा आनंद घ्या’; म्हणणाऱ्या काॅंग्रेस नेत्यानं मागितली जाहीर माफी

“निवडणुका आणि राजकारण हा तर खेळ, तो काळजीपूर्वक खेळला पाहिजे”

हात न लावता शेण उचलण्यासाठी शेतकऱ्याचा देसी जुगाड, पाहा व्हिडीओ

सचिन तेंडुकरची BCCI एन्ट्री?; सौरव गांगुली म्हणतो…

‘आता सहनशीलता संपत आली, टोकाचं पाऊल घ्यायला लावू नका’; अजित पवार संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More