बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! दोन वेळच्या अन्नासाठी ‘या’ ठिकाणी मुलं आणि किडनी विकण्याची वेळ

नवी दिल्ली | तालिबाननं अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर सगळीकडे गंभीर परिस्थिती उद्धभवली होती. अखेर तालिबानींनी अफगाणिस्तान काबिज केलं. अफगाणिस्तानच्या नागरिकांना तेव्हापासून अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे.

तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तानची परिस्थीती बिकट झाली आहे. वाढती गरिबी, बेरोजगारी, उपासमारी यामुळे येथील लोक हैराण झाले आहेत. लोक दोन वेळच्या भाकरीसाठी काहीही करायला तयार आहेत. त्यामुळे सद्यस्थितीला त्यांची परिस्थीती विदारक असल्याचं पहायला मिळत आहे.

दोन वेळच्या अन्नासाठी तेथील लोकांनी आपली किडनी आणि मुलेही विकावी लागत असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आपली किडनी विकली आहे. दोन वेळेच्या अन्नासाठी त्यांना हे धक्कादायक पाऊल उचलावं लागलं आहे.

दरम्यान, अफगािस्तानमधील काबूमध्ये हे धक्कादायक चित्र पहायला मिळत आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील सैन्य काढून घेतल्यानंतर आता त्या ठिकाणी पूर्णपणे तालिबानचा ताबा आहे.

थोडक्यात बातम्या – 

युक्रेनच्या रस्त्यावर महाकाय रशियन फौज, धक्कादायक फोटो समोर

Petrol Diesel Price : महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन दरात काय बदल झाले, वाचा एका क्लिकवर

युक्रेनमधून 182 विद्यार्थी मुंबईत, नारायण राणेंनी विमानतळावर केलं स्वागत

डायबिटीज पेशंट असाल तर ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश, शुगर राहिल कंट्रोलमध्ये

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसला, सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More