बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कारचालकाची मुजोरी! नियम मोडल्याचा जाब विचारल्यावर केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

मुंबई | मुंबईत ट्रॅफिक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई सुरु आहे. अनेक ठिकाणी नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. अशातच आता मुंबई ट्रॅफिक कर्मचाऱ्याला एक किलोमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कॉन्स्टेबल विजयसिंह गुरव अंधेरीच्या आझाद नगर मेट्रो स्थानकाखाली कामावर होते. त्यावेळी एक कार चुकीच्या दिशेने आली आणि ती गाडी पुढे एसव्ही रोडच्या दिशेने निघाली. त्यावेळी हवालदाराने कार चालकाला वाहन थांबवण्याचे संकेत दिले. त्यावेळी त्याला जाब विचारण्यात आला. परंतु त्याने काही ओळखपत्र दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यावेळी ट्रॅफिक पोलीस कर्मचारी गुरवने गाडीच्या बोनेटवर उडी मारली आणि चालकाने वेग वाढवला. कर्मचारीला सुमारे एक किलोमीटरपर्यंत ओढले गेले आणि त्यानंतर तो खाली पडला, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर चालकाने त्याठिकाणावरून पळ काढला.

उपनगर अंधेरी येथील डीएन नगर पोलिसांनी या घटनेनंतर अज्ञात कार चालकाविरोधात एफआयआर नोंदवला आहे आणि आरोपीचा शोध सुरू आहे,अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. उपस्थित असलेल्या अनेकांनी आरोपी चालकाचे हे कृत्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतोय.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेला ‘तो’ अध्यादेश लागू करावा”

“आता ते जिथूनही निवडणूक लढतील, मी त्यांना जिंकू देणार नाही”

पंजाब किंग्जला मोठा धक्का! ‘युनिव्हर्सल बाॅस’ आयपीएलमधून बाहेर

दिवाळीनंतरच सुरू होणार महाविद्यालये, मात्र… – उदय सामंत

मोठी बातमी! राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना सीबीआयकडून समन्स

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More