बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नेटकऱ्यांचा खोडसाळपणा! सिद्धार्थ शुक्लाऐवजी वाहिली ‘या’ सुपरस्टरला श्रद्धांजली

मुंबई | अभिनेता आणि बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्यानं गुरुवारी निधन झालं. मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये त्यानं अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्यानं मनोरंजन सृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच सध्या देशभरातून सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली जात आहे. मात्र सोशल मीडियावर काही लोक सिद्धार्थ शुक्ला ऐवजी दाक्षिणात्य सुपरस्टार सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहे.

सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ शुक्लाचे चाहते पोस्ट करत सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहे. मात्र काही लोकांनी यामध्येही खोडसाळपणा करत ‘रंग दे बसंती’ फेम आणि दाक्षिणात्य सुपरस्टार सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे. फोटो शेअर करत त्यावर ‘R.I.P सिद्धार्थ’ असं लिहिलं आहे. हा फोटो पाहून अभिनेता चांगलाच संतापला असून त्यानं नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

या आधीही सिद्धार्थसोबत असाच काहीसा प्रकार घडल्याचं समोर आलं होतं. एका युट्युब चॅनलनं त्याला मृत घोषित केलं होतं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली देण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानं यावर अॅक्शन घेत त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं.

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं रात्री झोपण्यापूर्वी काही औषध घेतले होते पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं रुग्णालयानं सांगितलं. त्याच्या अकाली जाण्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

पुण्यात तब्बल 91 गावं कोरोनाची हाॅटस्पाॅट; ‘या’ तीन तालुक्यांना मोठा धोका

अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नाट्यगृहे

…तर देवेंद्र फडणवीस खरे शिल्पकार असतील – चंद्रकांत पाटील

ओबीसी आरक्षणाचा विषय निकाली लागणार?; ‘या’ मुद्द्याला राज्यातील सर्व पक्षांचा पाठिंबा

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More