बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार!

रांची | रांचीमध्ये एका महिलेला कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला होता. दरम्यान जेव्हा ही महिला दुसरा डोस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर गेली असता तिला कोवॅक्सिनचा नाहीतर कोविशिल्डचा डोस दिला गेला. यानंतर महिलेची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे.

रांचीमधील शिवाजी नगर येथे राहणाऱ्या शीला देवी या लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी रांचीच्या बरियातू रोड येथील एडवांस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेल्या. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे या महिलेला कोव्हॅक्सिनऐवजी कोविशल्डची लस दिली गेली.

लस घेतल्यानंतर आईला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली, असं या महिलेचा मुलगा चंदन यानं सांगितलं. नंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना रांचीच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बरियातू रोड येथे घडली आहे.

महिलेच्या कुटूंबियांनी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एकच गोंधळ घातला. कुटूंबियांनी घातलेल्या गोंधळाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कुटूंबियांना शांत केलं.

थोडक्यात बातम्या- 

‘मी अभिनेता आहे पाॅर्नस्टार नाही’, किसींग सिनमुळे पारसचा वेब सिरीजला नकार

“…म्हणून महाराष्ट्रातील भाजपचा सहकारावर राग असणं स्वाभाविक”

तरूणाने संपूर्ण पाठीवर काढला शरद पवार यांचा टॅटू !

“छत्रपतींच्या गादीला डावलण्याचं काम करून भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”

“लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More