बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हरियाणातील धक्कादायक प्रकार! भर सभेत महिला IAS ऑफिसरची काढली छेड 

चंदीगड |  हरियाणाच्या फरीदाबाद येथे रविवारी जननायक जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या कार्यक्रमात एक महिला आयएएस अधिकारी आपलं कर्तव्य बजावत होत्या. कर्तव्यावर असतानाच एका अज्ञातानं महिला अधिकाऱ्याची  छेड काढली. स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

दुष्यंत चौटाला रविवारी संध्याकाळी एका कार्यक्रमासाठी फरीदाबाद येथे दाखल झाले होते.  याच कार्यक्रमात महिला आयएएस अधिकारी आपलं कर्तव्य बजावत होत्या. तेव्हा अचानक एक व्यक्ती आला आणि चुकीच्या पद्धतीने महिला अधिकाऱ्याला स्पर्श केला. त्यानंतर ऑफिसरने तात्काळ याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी आरोपीला लगेच अटक केली.

संबंधित आरोपीचं नाव साहिल अधाना असं आहे तो जननायक पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी फरीदाबादचा रहिवासी आहे. महिला ऑफिसरने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात कलम 354A आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीला सोमवारी स्थानिक न्यायालयात उपस्थित केल्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, फरीदाबादचे जननायक जनता पक्षाचे प्रवक्ता अरविंद भारद्वाज यांनी संबंधित आरोपी साहिल अधाना हा त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. तर कार्यक्रम सुरु असताना असं वाईट कृत्य करुन कार्यक्रमाला काळीमा फासण्यासाठी कुणीतरी त्याला पाठवलं असणार, असं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘शरद पवारांच्या पाठिंब्याचा आदरच, पण…’; नवनीत राणांचं रूपाली चाकणकरांना जोरदार प्रत्युत्तर

“होय, मी 15 ते 28 फेब्रुवारीदरम्यान मुंबईत होम क्वारंटाईन होतो”

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘हा’ मित्रपक्ष ठरणार डोकेदुखी?

एक रात्र माझ्यासोबत घालव!; अंकिता लोखंडेचा निर्मात्याबाबत धक्कादायक खुलासा

सचिन वाझेंची 200 पानी डायरी NIA च्या हाती; वाझेंची आर्थिक गुपितं होणार उघड?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More