बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कोरोनाबाधित रूग्णाने हॉटेलवर जात दारू पिऊन केलं जेवण अन्…

बुलडाणा | राज्यातील कोरोनास्थिती एकीकडे चिंताजनक होत असताना दुसरीकडे बुलडाण्यात एक कोरोनाबाधित रूग्ण जेवणासाठी आणि दारू पिण्यासाठी कोविड रूग्णालयातून बाहेर पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराजवळ घाटापुरी येथील एका कोविड सेंटरमधली ही घटना आहे. एक 55 वर्षीय कोरोना रुग्ण जेवणासाठी आणि मद्यप्राशनासाठी कोविड रुग्णालयाच्या बाहेर पडल्याचा प्रकार समोर आला आहे. तो एका हॉटेलवर गेला तिथे त्याने दारु प्यायली आणि त्याच ठिकाणी जेवणही केलं.

मद्यप्राशन जास्त झाल्याने तो कोरोनाबाधित रूग्ण रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्यावेळी काही समाजसेवकांनी त्याला उपचारासाठी खामगाव शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याचबरोबर माघे घाटपुरी येथील कोविड सेंटरवर निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच सांगितलं जात होतं. त्यानंतर आता हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, घाटपुरी येथील कोविड सेंटरमधून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क बाहेर जाऊन अनेकांच्या संपर्कात येतो. त्यावेळी कोविड सेंटरमधील सुरक्षा यंत्रणा काय करत असते? तहसीलदार याकडे दुर्लक्ष का करत आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर, राज्यात काल दिवसभरात तब्बल 25 हजार 833 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

थोडक्यात बातम्या

शिवसेनेच्या ‘या’ पदाधिकाऱ्याची प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

अंमली पदार्थ देऊन करायचे…;ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

महाराष्ट्रातील लाॅकडाउनसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

‘रात्री 11 पर्यंत न थकता काम, काय खाता?’; अभिनेत्याचा किशोरी पेडणेकरांना सवाल, म्हणाल्या…

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More