बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भूस्खलनामुळे 15 फूट रस्ता खचला; कोल्हापुरातील धक्कादायक व्हिडीओ समोर

कोल्हापूर | संपूर्ण राज्यात धुवाँधार पाऊस पडतोय. राज्यांतल्या अनेक शहरांत पूर आलाय. पावसामुळे अघटित घटना घडल्या आहेत. या घटनेत आतापर्यंत जवळपास 110 नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. कोल्हापुरात देखील गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे.

अतिववृष्टीमुळे कोल्हापुरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भूस्खलनाच्याही घटना समोर आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील अणदूर धुंदवडे रस्ता तब्बल 15 फूट खचला असल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना समोर येत आहेत. अणदूर धुंदवडे रस्ता खचल्याने आजूबाजूच्या पंधरा-वीस गावांचा संपर्क तुटला आहे. काल ही घटना घडली आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 97 बंधारे अजूनही पाण्याखाली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 52 फुटांवर येऊन पोहोचली आहे. शुक्रवारी रात्री हीच पातळी 56 फुटांवर होती, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा धोका निर्माण झाला होता. आता पावसाने उसंत घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावरच मोठं संकट टळलंय. 

थोडक्यात बातम्या-

डोक्यावरचं छप्पर उडालेल्या कोकणी बांधवांसाठी राज ठाकरेंकडून 1 हजार सोलापुरी चादरी!

आता करण जोहर करणार ‘बिग बाॅस 15’ चं सूत्रसंचालन!

पुरामुळे कोल्हापुरातील ‘हे’ महत्वाचे रस्ते बंद

पुन्हा कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने दाम्पत्याने उचललं धक्कादायक पाऊल!

सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता – डाॅ. रणदीप गुलेरिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More