धक्कादायक! राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडलं मतदान यंत्र

जयपूर|राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर रस्त्यावर मतदान यंत्र सापडल्याचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.  

मतदान यंत्राच्या बाबत विविध राजकीय पक्षांच्या मनात संशय असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे निवडणूक आयोगाने अब्दुल रफीक आणि नवल सिंह पटवारी या दोन निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं आहे. 

दरम्यान, राखीव असलेले मतदान यंत्र ट्रकमधून रस्त्यावर पडले असावेत, असा अंदाज जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी वर्तवला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-विराट कोहली मैदानात नृत्य करतो तेव्हा..

-योगी आदित्यनाथ हे तर अंगठाछाप- असदुद्दीन ओवैसी

“मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”

-चोपडा पोलीस निरीक्षक मारहाण प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची बदली

आम्ही दत्तकाच्या जोरावर घर चालवत नाही; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका