लखनऊ | 16 जानेवारीपासून संपूर्ण देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता लसीच्या दुष्परिणामाच्या घटना मोठ्याप्रमाणावर समोर येताना दिसत आहेत. ही बाब अगोदरच केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे कोरोनाची लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या मृत व्यक्तीचं नाव महिपाल असून ते रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कामाला होते. 16 जानेवारीला महिपाल यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. ही लस घेतल्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानकपणे ढासळली. त्यानंतर महिपाल यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
दरम्यान, औरंगाबाद येथील 352 स्वयंसेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली होती. त्यातील 90 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीची रिअॅक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे.
थोडक्यात बातम्या-
ऋषभ पंतने माहीचा हा विक्रम मोडत झाला नंबर वन यष्टीरक्षक
ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष मोठा?; फायनल आकडे आले समोर
भारतातील ‘या’ प्रदेशात पहिल्यांदाच आढळला कोरोनाचा रुग्ण
ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“ईडी, सीबीआयच्या ‘कार्यकर्त्यां’ना हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडविता येणार नाही”