Top News पुणे महाराष्ट्र

धक्कादायक! पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमध्ये महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न!

पुणे | सध्या आजकाल आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार कानावर पडत आहेत. यातच भर म्हणजेच पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छतागृहाची काच फोडून महिलेनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रविवारी म्हणजेच 13 डिसेंबर रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार साधारण दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास घडला. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेच नाव ऊज्वला भाऊ चोरगे असून त्यांचं वय 30 वर्षे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याबाबत चौकशीसाठी पोलिसांनी उज्वला यांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आलं होतं.

त्यानंतर चौकशी दरम्यान उज्वला यांनी लघुशंकेचा बहाणा करत त्या पोलीस ठाण्यातील महिला स्वच्छतागृहात गेल्या. तेथील आरशाची काच फोडून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी उज्वला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात ‘तुकडे-तुकडे गॅंग’-रविशंकर प्रसाद

‘कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबा पण…’; सुधीन मुनगंटीवार अधिवेशनात आक्रमक

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

“मोदी सरकारचे धोरण नको तिथं बोलायचं आणि हवं तिथं हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं”

विश्वासघात करुन सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारची दादागिरी चालू देणार नाही- गोपीचंद पडळकर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या