बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वकील असलेल्या पत्नीनेच केली पतीची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

पाटणा | बिहारमधील पाटणा-बख्तियार भागात खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. 19 मार्चला एका शिक्षकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या चार पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासानंतर अखेर हे हत्याकांड त्याच्या वकील पत्नीनेच घडवून आणल्याचं समोर आलं आहे.

चार लाखांची सुपारी देऊन वकील प्रियकराच्या साथीने वकील महिलेने शिक्षक पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या करण्यात आली होती. जमीन खरेदीच्या व्यवहारावेळी ही हत्या झाल्यानं पोलिसांना शंका आली आणि तपास त्या दिशेने करण्यास सुरवात झाली. आरोपी पत्नी प्रतिमाकुमारी आणि तिचा प्रियकर सुनील गोस्वामी या दोघांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघंही पाटण्याच्या सिव्हील कोर्टात वकिली करत होते. दोघं कायम सोबत असायचे, पण वकिलीच्या कामाचं कारण पत्नी देत असल्यानं शिक्षक पतीला कधी संशयही आला नाही. मात्र प्रेमात अडथळा ठरत असल्यानं पतीचा काटा काढण्याचं कट या दोघांनी रचला आणि शिक्षक पतीची हत्या करण्यात आली. महत्वाचं म्हणजे हत्येमागं दोन वकिलांचं डोकं असल्यामुळं पोलिसांची पुरावे गोळा करताना मोठी दमछाक झाली होती.

पत्नीने हा कट असा रचला, तिने पतीकडे जमीन खरेदीसाठी हट्ट धरला. अखेर शिक्षक पती राजी झाला. खरेदीसाठी जमीन पाहण्याचा दिवस ठरला. पती एका बाईकवर निघाला, तर पत्नी मुलीसोबत आपल्या स्कूटीवर बसून त्याच्या मागोमाग निघाली. पतीवर कुठे आणि कसा हल्ला होणार, याची तिला माहिती होती. त्यामुळे जाणूनबुजून तिने आपली स्कूटी थोडी मागेच ठेवली होती. छपाक वॉटर पार्कजवळ पोहोचताच सुपारी घेतलेल्या गुंडांनी शिक्षक पतीला घेरा घातला. त्याच वेळी त्याची गोळी झाडून हत्या केली. काही मिनिटातच पत्नी घटनास्थळी पोहोचली. पतीला गोळी लागल्याचा पाहून तिनं रडण्याचं नाटक केलं. जमीन व्यवहारासाठी सोबत घेतलेले चार लाख रुपये लुटण्याच्या उद्देशाने पतीची हत्या झाल्याचा बनाव तिने रचला होता.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फूटेज तपासलं, तेव्हा वकील प्रियकर सुनीलही तिथे असल्याचं आढळलं. शिक्षकाच्या घरी त्याचं येणं-जाणं असल्यानं पोलीस तपासात समोर आलं. पोलिसांनी कसून तपास केल्यावर वकील महिलेचे त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध उघड झाले आणि दोघांनीच शिक्षकाची हत्या केल्याचं समोर आलं. सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी बक्सरमधून अटक केली आहे.

थोडक्यात बातम्या

“…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवलं”

‘आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली’; दिपाली यांचं पतीला लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल

जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

…तर आम्ही रश्मी शुक्ला यांच्यासोबत आहोत- प्रणिती शिंदे

‘हा’ कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More