परभणी | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ होत आहे. वाढणाऱ्या उष्णतेचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यातच आता उन्हाळा (Summer)आणखी तीव्र होताना दिसत आहे. उष्मघातानं अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
भर उन्हात लग्नाच्या वरातीत नाचल्यानं तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकही घाबरले आहेत. परभणी जिल्ह्यात मित्राच्या लग्न वरातीत नाचून थकलेल्या एका युवकाने थंड पाणी पियाल्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणाचा नाव सोहन असं होतं.
सध्या परभणीत तापमानाचा पार 41 अंश इतका आहे. भर उन्हात नाचल्याने उष्माघातानेच सोहमचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक लोकांना उष्माघाताच्या समस्या जाणवत आहेत. जिंतूरच्या सराफा व्यापारी धनंजय शहाणे यांचा मुलगा सोहम हा मित्राच्या लग्नासाठी भर दुपारच्या उन्हात मोटारसायकलवरुन परभणीत मित्राच्या लग्नाला आला होता.
विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात तापमान आणखी वाढणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. विदर्भात 18 ते 20 एप्रिल दरम्यान, उष्णतेची लाट येणार आहे. तर कोकण पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर पावसाची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या –
18 ते 20 एप्रिल दरम्यान ‘या’ भागात उष्णतेचा कहर, वाचा हवामान खात्याचा इशारा
100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांची सारवासारव, म्हणाले…
मोठी बातमी ! लोटे एमआयडीसीत पुन्हा भीषण आग, कोट्यावधींचं नुकसान
कोल्हापूरच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
रशियाकडून युक्रेनच्या 8 शहरांवर हल्ला, ‘इतके’ हजार नागरिक बंदी करण्यात आले
Comments are closed.