Top News

धक्कादायक! शिंक आली म्हणून सरकारी कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

अहमदाबाद | गुजरातच्या अहमदाबादमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहमदाबादमधील काही युवकांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला सरकारी कार्यालयात शिंक आली म्हणून बेदम मारहाण केली आहे.

एक पोलीस कर्मचारी सरकारी कामानिमित्त सरकारी कार्यालयात आला होता. त्यावेळी या पोलीस कर्मचाऱ्याला शिंक आली. त्यामुळे तेथेे असलेल्या दोन युवकांनी त्याला शिव्या देत मारहाण करण्यास सुरवात केली. त्या पोलीस कर्मचाऱ्यानं आपण पोलीस असून सरकारी कामकाजासाठी आलो असल्याचं सांगितलं. तरीही त्या युवकांनी त्याचं काहीही ऐकून न घेता आणखी 3 जणांना बोलवून मारहाण केली.

त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी अरोपींच्या तावडीतून पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या नाकाला मोठी इजा झाली असून डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान, शिंक ही अशुभ असल्याचं म्हणत आरोपींनी मारहाण केल्याचं पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सचिनच्या घराबाहेर बॅनरबाजी करणाऱ्या ‘स्वाभिमानी’ मुलाचं नेमकं म्हणणं काय? पाहा व्हिडीओ-

मग मनमोहनसिंग यांचा जीएसटीचा कायदा का मंजूर केला नाही?- नाना पटोले

नवऱ्यानं बायकोला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं अन् त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

‘आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?’; ‘स्वाभिमानी’ पोराचं सचिनच्या घराबाहेर आंदोलन

‘रोज डे’ ठरला ‘लास्ट डे’, ‘या’ कारणामुळं पुणेकर तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या