एमआयएमच्या सभेत बूट भिरकावला, ओवैसी थोडक्यात वाचले!

मुंबई | एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत बूट भिरकावल्याचा प्रकार समोर आलाय. मुंबईच्या नागपाडा भागात ओवैसींची सभा सुरु असताना हा प्रकार घडला. 

ओवैसी तीन तलाकच्या मुद्द्यावर बोलत होते. यावेळी अचानक लोकांमधून कोणीतरी बूट भिरकावला. या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. ओवैसींनी भाषणही थांबवलं होतं. 

बूट फेकणारे लोक महात्मा गांधी, गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या विचारधारेचे अनुकरण करणारे आहेत, असं ओवैसी यावेळी म्हणाले. दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून त्याला लवकरच अटक करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.