खेळ

‘वर्ल्डकप खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वक्तव्य

नवी दिल्ली | आयसीसीने टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलल्यामुळे आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. युएईमध्ये सप्टेंबर महिन्यापासून आयपीएलला सुरुवात होणारे. मात्र आयपीएल सुरु होण्याच्या निर्णयावर पाकिस्तानचा रावळपिंडी एक्स्प्रेस नाखूश असल्याचं दिसतंय. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ‘वर्ल्डकप खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’, असं वक्तव्य केलंय.

गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केला जात नाही. यामुळे पाकिस्तानला फायदा नाही तर नुकसानच होतंय. शिवाय आयपीएल सुरु असताना सर्व देशाचे खेळाडू या स्पर्धेत भाग घेत असल्याने पाकिस्तान कोणत्याही मोठ्या संघाबरोबर मालिका खेळू शकत नाही. त्यामुळे आयपीएल सुरु झालं तर पाकिस्तानचं नुकसान होतं.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी शोएबने केली होती. त्याच्या या मागणीला पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंचा चांगलाच पाठिंबा मिळाला होता. पण भारताच्या माजी खेळाडूंनी शोएबवर टीका केली होती. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका शक्य नाही, असं भारतीय खेळाडूंनी म्हटलंय.

भारत आणि पाकिस्तान मालिका होऊ दिली नाही. भारत आणि पाकिस्तान आशिया चषक स्पर्धेत खेळणार होते, पण ही स्पर्धाही रद्द करण्यात आली. टी-20 वर्ल्डकप स्पर्धा होणार होती मात्र ती सुद्धा रद्द करण्यात आलीये. हे सर्व कसं घडतंय याची मला कल्पना आहे. एकवेळ वर्ल्डकप खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल मात्र व्हायला हवी. भारताने क्रिकेट वाचवलं पाहिजे. नाहीतर त्यांच्या पुढच्या पिढीला या गोष्टीचा फटका बसू शकतो, असं शोएबने म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

समाजकार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे, ‘स्व’-रुपवर्धिनीचे ज्ञानेश पुरंदरे यांचं निधन

सुशांतसाठी अंकितानं लिहिली आणखी एक पोस्ट, पोस्टमध्ये म्हणते…

आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी तज्ज्ञांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली मदत

महाविकास आघाडीमध्ये पुन्हा नाराजीनाट्य; काँग्रेसच्या ‘या’ निर्णयामुळे शिवसेना-राष्ट्रवादी नाराज!

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या