नागपूर महाराष्ट्र

पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

बुलडाणा | पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बँक आधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. बुलडाणा जिल्हयातील दाताळा गावात हा प्रकार घडलाय.

पीक कर्जासाठी सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेत अर्ज करताना संबंधित शेतकऱ्याने आपल्या पत्नीचा फोन नंबर दिला होता. शाखाधिकारी राजेश हिवसेने त्या नंबरवर फोन करुन शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली.

दरम्यान, पीडित महिलेने याप्रकरणाची रेकॉर्डिंग करुन पोलीसात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी राजेश हिवसेसह शिपाई मनोज चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-काय सांगता??? मोबाईलमध्ये रेंज नसली तरीही करता येणार फोन!

-दमानिया-खडसे वाद पुन्हा पेटला; खडसेंनी उचललं पुढचं पाऊल!

-भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या संशयाची सुई मुंबई-पुण्यात?

-मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची समज नाही!

-सध्या कोणत्याही गोष्टीला विरोध केला की देशद्रोही ठरवलं जातं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या